कष्टकरी
कष्टकरी
1 min
314
पहा कष्टकरी
घाम तो गळतो
सुगंध कष्टाचा
तो दरवळतो
रस्त्याच्या कडेला
उभी डोई भार
कशाला हो तीला
फॅशनचा मार
शेतात नार ती
गोफण घेवून
विश्वसुंदरी ती
घ्यावेत जाणून
सौंदर्य ते खुलते
कष्टातच सारे
फॅशन हो तीच
वाहतात वारे
