क्षण हे मज भेटले
क्षण हे मज भेटले

1 min

11.5K
सुख दुःखाचे येणे जाणे
माहिती होतं ह्या क्षणांना
मुके राहिली हे क्षण
शोधत आहे मी ह्या क्षणांना
कळते मज शोधीले मी
आठवणीत माझ्या लपले ते
सांगावा धाडीले मी त्यांना
कळू दे मज केव्हा आगमन ते
क्षणा क्षणाशी केली मी मैत्री
काळजी लागली भूत भविष्याची
सद्यस्थितीतले हे क्षण
फिरतात सहज चौफेर
कसेही असले तरी ते क्षण
माझे होते हे मी जाणते
ते जवळ घेतात, आनंदाचे हे क्षण
ते मला सहज देऊनी जातात