क्षण आनंदाचे
क्षण आनंदाचे
1 min
729
अजूनही डोळ्यापुढे
तेच सोनेरी क्षण
प्रत्येकाच्या मनामधे
भरे आनंदाचे क्षण
पास झाले स्पर्धापरीक्षा
लढत अटीतटीची
छान नोकरी मिळाली
मनी लहर खुशीची
आशिर्वाद देती मज
आई बाबा ताई
आनंदाश्रू डोळ्यांत
कसे दाटून येती
क्षण सौख्याचा आनंदाचा
गेलो भारावून सारे
पेढे ठेवले देवासमोर
घरात आनंदाचे वारे
कधी नाही विसरणार
आनंदाची ही लहर
चेहरे उजळल्यावर
आनंदाचा पाझर
असे आनंदाचे क्षण
मन व्यापून टाकतात
आता निवृत्ती नंतरही
डोळे भरुन येतात
