कश्मीर (सहाक्षरी)
कश्मीर (सहाक्षरी)
1 min
260
भारताची शान
कश्मीर हा माझा
स्वर्गीय असाच
अनमोल ठेवा
निसर्ग तो पहा
कश्मीरात आला
नंदनवन तो
करून हो गेला
रम्य ते ठिकाण
लागल्या नजरा
सदा रक्तपात
दहशत पहा
अशांत प्रदेश
उद्रेक कशाचा ?
निघावा तोडगा
वाटे या मनाला
