कसे सांगू तुला
कसे सांगू तुला
1 min
360
हे दु:ख मनाचे
कसे सांगू तुला
हा खेळ मनाचा
अवचित घडला....
विस्मृती मधूनी
विसरले स्वतःला
आठवीत होते
प्रत्येक क्षणाला....
हरपले ते स्वत्व
माझ्या या लोचनी
चांदण्यात झुरले
शांत या नभातूनी....
मनाच्या कळयांनी
एकदा तरी फुलावे
निसटलेले ते क्षण
एकदा तरी सांगावे....
किती हा अट्टाहास
माझ्या या मनाचा
संगतीत असूनही
विचार ना कुणाचा....
