STORYMIRROR

Mina Shelke

Others

3  

Mina Shelke

Others

करू साफसफाई मनाची

करू साफसफाई मनाची

1 min
29K


आली आली दिवाळी

चला साफसफाई करू...

घरासोबत मनाचीही

स्वच्छता नेटकी करू ....


अडगळीची खोली करा ,..

लख्ख घासून पुसून

जुन्या नात्यालाही जरा

घ्या नव्यात सामावून ...


माळ्यावर ठेवलेली वही ...

पहा पून्हा एकदा चाळून ....

मनामनाशी जोडलेलं नातं

घ्या नजरेत माळून ....


अहंकारी , द्वेषाच्या भिंतीना

लावा माणूसकीची रंगरंगोटी

नव्यानं प्रकाशमान होतील ,...

मनं झालेली वांझोटी ....


तनासोबत मनाचंही व्हावे ...

अभंग पवित्र अभ्यंगस्नान

उजळताना ज्योत नेकीची

चेहरा कुणाचाही नको म्लान ....


अंधाऱ्या कोनाड्यात ...

दिवा दिवाळीचा पाजळू ....

अंधकार मनामनातला सारून

नव्याने नाती उजळू ...


Rate this content
Log in