कृषी दिन
कृषी दिन
1 min
14.5K
कष्ट करे शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राबून घामात
ओली झाली काळी माती ।।
कृषी प्रधान देशात
नाही खेळला सुखाशी
दानं पुरवी जगाला
स्वतः राहून उपाशी ।।
नाव जगाचा पोशिंदा
फाशी घेतो बांधावरी
हात सफाई करुन
मोठा होतो रे व्यापारी ।।
गुरा ढोरासाठी मरं
थंडी वाऱ्या पावसात
तान्ह्या वासराची माय
नाही तापत उन्हात ।।
कृषी दिना निमित्ताची
कशी कळावी कविता
माझ्या या बळीराजाला
असे का रे पिळीवता ।।
