करोनाने
करोनाने
1 min
221
करोनाने वाट लावली
आता कसं करशील
किती दिवस घरातच
मुकेपणानं पाणी भरशील
करोनाने दाखवलं रूप
दाखवला त्याचा धाक
भल्या भल्यांना लावल
रगडायला त्याने नाक
करोनाने घडवली भलतीच
दवाखान्याची अवघड वारी
त्याच्या जाचाला बिचारी
कंटाळली दुनिया सारी
करोनाने पाजल पाणी
दाखवला जगाला इंगा
चार हात दूरच रहा
नका येऊ तुम्ही रंगा
करोनाने शिकवली स्वच्छता
शिकवला मनाचा संयम
विसरून जावू नका कोणी
आठवणीत ठेवा कायम
