करोना...का रोना?
करोना...का रोना?
अजून संकट करोनाचे खूप लांब आहे
वाटत होते ना असेच?
धडकलं आपल्याही शहरात
काळजी कशी घ्यायची आता?
प्रशासनाच्या रोज नवीन सुधारीत सूचना
पाळत राहायच्या आपण घरी बसूनच?
डोक्यात नवनवीन विचार येतात
शेअर बाजाराची घसरण पाहताना?
जगातल्या लागण झालेल्यांची संख्या
वाढताना कोणते कयास लावले जाताय?
मरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय
बातम्या पाहताना धडकीच बसते ना मनात?
काय कसं होणार आता करत बसायच की
राहून गेलेले छंद घरातल्या घरात सांभाळायचे?
काढा ती सर्व पुस्तकं घरातली का रोना करत
झटका आळस, करा सुरुवात पुस्तक वाचनाची!
घ्या लेखनी हाती, करा मन मोकळे
लिहुन काढा मनातले!
काढा मनसोक्त चित्र... रंगवा भिंती
बनवा नवनवीन पदार्थ चवीचे!
