Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

2  

Chandan Pawar

Others

कर्जमाफी हवी आम्हांला......

कर्जमाफी हवी आम्हांला......

2 mins
301


नरेन्द्रा -उद्धवा "अच्छे दिन "

आम्ही म्हणू तरी कशाला ?

वेतन नको , पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला.....


शेतकऱ्याचा आर्त टाहो कधी

तुम्हाला दिसत नाही ;

सरकार कोणतेही असो

आत्महत्या आमच्या टळत नाही .

आमच्या करुण किंकाळ्या

कानात तुमच्या शिरत नाही ;

खोट्या मलमपट्टी शिवाय तुम्ही

दुसरं काही करत नाही .

असं खोटं सांत्वन करून

जखमेवर मीठ चोळता तरी कशाला?

वेतन नको, पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला......


शेतकरी वेडा खुळा असतो

अशी सर्वत्र ओरड आहे ;

सरकारशी भांडता भांडता

विरोधकांच्या घशाला कोरड आहे .

विरोधी बाकावर बसल्याविना

आमचे डोहाळे कोणाला लागत नाही ;

आमच्या कळवळ्याचे खोटे पुराण

दुसरे कोणी सांगत नाही .

अशा खोट्या सहानुभूतीने

खुर्चीचे भांडवल करता तरी कशाला ?

वेतन नको ,पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला......


" आई जेवू घालीना बाप मरू देईना"

अशी आमची गत आहे ;

कृषिप्रधान देशातील शेतकरी

बुडवायचा अघोरी बेत आहे.

पिकले अन न पिकले काय

आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही;

नवा दिवस नवे संकट

आणल्याशिवाय येत नाही .

असं आम्हांला मारून स्वतःच्या

तिजोऱ्या भरता तरी कशाला ?

वेतन नको ,पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला.....


पॅकेज व कोरड्या आधाराचे

शब्द सत्ताधीशांच्या गळी आहेत ;

दूरदर्शन वरील "ब्रेकिंग न्यूज "मध्ये

आमचे" लाईव्ह बळी "आहेत .

आमची कर्जमाफी म्हणजे सरकारी

तिजोरीतील" धन की बात "आहे ;

माजी मुख्यमंत्र्यांची जनतेबरोबर

थेट "मन की बात " आहे .

असे "डर्टी पॉलिटिक्स" करून

जनसेवा करतात तरी कशाला ?

वेतन नको ,पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला.....


सावकार- व्यापाऱ्यांकडून नेहमी

आम्हांस " चंदन " असते ;

आमच्या कर्जमाफीवरून

लोकप्रतिनिधीत रणकंदन असते .

मल्ल्या- मोदीसारख्या कर्जबुडव्यायांना

आपल्या देशात कर्जमाफी आहे ;

त्यामानाने शेतकरी कर्जमाफी

अनेकपटीने सोपी आहे .

असा भेदभाव समतेच्या राष्ट्रात

करतात तरी कशाला ?

वेतन नको, पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला........


आमच्या कष्टाचे- घामाचे

रक्त आम्ही कितीदा सांडू ?

आमच्या नरकयातना

सरकार दरबारी कितीदा मांडू ?

कृषिप्रधान भारत आपला

तेव्हाच महासत्ता होईल ;

जेव्हा शिवकाळातील रयतेची

बळीराजाची सत्ता येईल .

अशा शिवशाहीच्या खोट्या

करता तरी कशाला ?

वेतन नको, पेन्शन नको

कर्जमाफी हवी आम्हांला.....


Rate this content
Log in