क्रांतिज्योती
क्रांतिज्योती
1 min
381
अज्ञानाच्या काळोखात नि
रूढींच्या बंधनात
अडकून पडली होती
समस्त नारी जात।।१।।
उद्धार त्यांचा करण्या अन्
तोडण्या बंधपाश
एक क्रांतिज्योत पेटली
करण्या अन्यायाचा विनाश।।२।।
शेणगोळ्यांचे वार झेलुनी
शिक्षणाची कवाडे उघडली
परिस्थितीशी झुंज देऊनी
हार कधी ना तिने मानली।।३।।
विधवा केशवपन अन्
बालहत्या रोखुनी
अनाथांसाठी आपले सारे
आयुष्य दिले झोकुनी।।४।।
ज्योतिबांची सावित्री तू
नारी जातीची प्रेरणा झाली
आज म्हणूनच समस्त नारी
अतुलनीय, सक्षम झाली।।५।।
