STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Others

3  

Ganesh G Shivlad

Others

क्रांतीचा सूर्य..!

क्रांतीचा सूर्य..!

2 mins
252

अंधकार अज्ञानाचा या देशातून दूर व्हावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।धृ।।


देवी सावित्रीचे पुन्हा जगी या आगमन व्हावे।

मुली महिलांना येथे विनामूल्य शिक्षण मिळावे।

सावित्रीच्या या लेकीनां मार्गदर्शक लाभावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।१।।


स्त्री पुरुष असमानतेची दरी त्वरीत हो मिटावी।

विधवा परित्यक्ता स्त्रियांना न्याय हा लाभावा।

सवित्रीसारखा त्यांना आत्मसन्मान मिळावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।२।।


वंचित पीडित कामगार मजुरांना ज्ञान लाभावे।

शेतकऱ्याच्या गरीब मुलांना शिक्षण हो मिळावे।

अज्ञानाच्या गुलामगिरीतून समाज मुक्त व्हावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।३।।


घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला न्याय हो मिळावा।

त्याच्या कष्टाच्या सोन्याला भाव सोन्याचा मिळावा।

शेतकऱ्याचा आसूड हो पुन्हा लिहिला जावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।४।।


अज्ञानाची अन्यायाची घोर काळ रात ही सरावी।

सावित्री ज्योतीची ही ज्ञान प्रभा सर्वदूर फाकावी।

तेजोमय क्रांतीने या ज्ञान सुगंध पसरावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।५।।


शिक्षणाचे पेरून बीज घरोघरी कुंभ ज्ञानाचे भरावे।

भारत मातेला माझ्या या पुन्हा गोड स्वप्न पडावे।

तिच्या उदरी पुन्हा ज्योतिबा जन्मा यावा।

क्रांतीचा सूर्य पुन्हा एकदा उदयाला यावा।।६।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍