क्रांती सुर्य
क्रांती सुर्य
1 min
1.0K
गर्व वाटतोय मला
भीमराव जन्मा आला
अंधरल्या झोपडीत
क्रांती सुर्य उगवला ।।
उजडली निळी पहाट
होतं निळंच वादळ
भीमा तुझ्या जन्मानं
झाला नवीन बदल ।।
दिला माणूस म्हणून
जगण्याचा आधिकार
दीन दलितांचा केला
जन्मी येउन उद्धार ।।
गरीबीत रमाईने
दिली भरपूर साथ
दुःख गिळून आवघे
केली स्थितीवर मात ।।
संविधान भारताला
देई भीमराव माझा
दलितांना न्याय दिला
झाला हृदयाचा राजा ।।
