STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

कोरोनाची साखळी तोडुया

कोरोनाची साखळी तोडुया

1 min
401


मृत्यूची ही साखळी

घरी बसून तोडूया

कोरोना विषाणूला

जगातून संपवूया


देऊ साथ सरकारला

घरात थांबून आपण

बाहेर पडून जीव धोक्यात

नका घालू विनाकारण


बाहेर पाऊल टाकताना

कुटुंबाचा करा विचार

परिस्थिती जाता हाताबाहेर

होऊनी बसाल लाचार


जीवन आपले अनमोल हे

खेळू नका त्याच्याशी

पुन्हा भेट मग होणार नाही

आपल्या माणसांशी


एक संधी जीव वाचवण्याची

घरातच बसणे आहे

करा सोने संधीचे त्या

त्यातच शहाणपण आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन