कोरोना ( अभंग रचना )
कोरोना ( अभंग रचना )
1 min
301
कोरोना बंदिला | सगळे धावले |
घरात जाहले | बंदिवान ॥ १ ॥
स्वतःच्या मर्यादा | स्वतःच पाळता I
हात पहा धुता | साबनाने ॥ २ ॥
तोंडाला बांधले | मास्क जवळचे I
हात रूमालाचे | कामी आले ॥ ३ ॥
घरात थांबुन I काम ऑफीसचे I
ऑनलाईनचे I सांभाळावे ॥ ४ ॥
कैदेत मानव l प्राणी पाहतात I
ते पलटतात | दिस कसे ? ॥ ५ ॥
