कोपरखळी
कोपरखळी
1 min
172
आल्या होळीच्या सणाला
सासूबाई आवर्जून
पुरणपोळीचा हट्ट
बसल्या की हो धरुन (१)
डाळ आधी निवडून
वाटीने मोजून घ्यावी
गरम पाण्यात तेल
हळद थोडी घालावी (२)
लक्ष सारख्या ठेवीत
हटताना की पुरण
गूळ मोजून घाल
पातळ होईल पुरण (३)
कणीक सैल तिंबावी
भरपूर तेल घाल
कणकीत सूनबाई
थोडासाच मैदा घाल (४)
उंडे भरले पुरणाने
गोल पातळ पोळी
कोपरखळ्यांनी सूनेला
सासूने बेजार केली (५)
