कोण?
कोण?
1 min
275
सावली विचारते मजला
कोण कोणाचे आहे
हरवलेत प्रश्न तुझेही
उत्तर कोणाचे आहे
श्वास श्वासात गुंफूनी
आकाशी पक्षी आहे
त्या सुद्धा थव्यात
स्वतःत काय शोधतोय
नाही माझे मी
नाही तुझे मी
या मातीला विचार
कोण कोणाचे आहे
माथ्यावरी हात त्याचा
कुशीत सारे जग
विचार त्या पाखराला
कोण कोणाचे आहे
