STORYMIRROR

shubham machave

Others

4  

shubham machave

Others

सरत्या वर्षाला निरोप

सरत्या वर्षाला निरोप

1 min
2.2K

महिन्यांनी भरलेला, त्यात माझ्या आठवणी

कसा देऊ तुला निरोप, सांग एकदा तरी


जे तू दिलंस ते मी घेतलं

चांगल्या सोबत वाईटही ही भोगलस


ऋतू बदलले तसे माणसे ही बदलली

आता तर सर्वांचे मुद्रा दिसलीत


होळीचा तो रंग तसा दिव्याचा लखलखाट

का सोडून जातोस आम्हा एकटास


मान्य तू जाशील, नवं वर्ष येईल

नवं पर्व नवी सुरुवात होईल


तू उगवलेल्या सुर्यासोबत चिमण्यांचा किलबिलाट दाखवलास

तशी पुनवेची ती रातराणी दाखवलीस


शेवटी जाशील तू तर जा मग

मात्र निरोप माझा सोबत घेऊन जा मग


Rate this content
Log in