प्रेम असंच असतं...
प्रेम असंच असतं...
1 min
136
कुणाची तरी आस लागत राहणे म्हणजे प्रेम असतं,
कुणाची वाट बघत राहणे म्हणजे प्रेम असतं
कधी आसवांना घेऊन येत तर,
कधी सातासमुद्रापार घेऊन जात ते प्रेम असतं
प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो,
प्रत्येकाला बदलणार म्हणजे प्रेम असतं
चिमणीचं पिलांवर असत तर,
आईचं बाळावर असतं ते प्रेम असतं
प्रेम हे सोपं असतं पण,
नात टिकवणं मात्र अवघड असतं
कुणाला हसवणं तर,
कुणाच्या मनात घर करणं हे प्रेमच असतं
प्रत्येकाला प्रेम असतंच अस नसतं,
असलेल्या ला टिकवता येत अस नसतं.
म्हणूनच प्रेम प्रत्येकाला नसतं,
कारण प्रेम हे प्रेमच असतं
