जीवन
जीवन
1 min
270
कधी असंही जगावं लागतं
कधी असंही जगावं लागतं
खोट्या हास्याच्या पडद्याआड
खरे दुःख लपवावं लागतं
कर्तव्याच्या नावाखाली
स्वतःला राबवावं लागत
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी
डोळ्यातले पाणी लपवावं लागतं
तीव्र इच्छा असूनदेखील
नाही म्हणावं लागतं
खूप प्रेम असूनदेखील
नाही असं दाखवावं लागतं
असं इतरांना हसवता हसवता
कधी खूप रडावं लागतं
कधी असंही जगावं लागतं
कधी असंही जगावं लागतं
