कोंबडीची पिल्ले ( अभंग रचना )
कोंबडीची पिल्ले ( अभंग रचना )
1 min
537
कोंबडीचीे पिल्ले | पहाटे उठली I
मान फिरवली I भोवताली ॥ १ ॥
पिवळी धम्मक | कोवळी किरणे |
सोणेरी तोरणे | चकाकती ॥ २ ॥
पांढरी पांढरी I गोजीरवाणी ती |
पिवळी भासती | प्रकाशात ॥ ३ ॥
चोचीणं अंग ते | साफ तो करतो |
दुसरे पाहतो | कुतुहले ॥ ४ ॥
आयुष्य लहान | आहे ते आपले |
तरी ही जपले | नाते असे ॥ ५ ॥
