कोंब उमलला गर्भात !!
कोंब उमलला गर्भात !!
1 min
208
जगणे झाले आज मोकळे
तुझ्या कुशीत मन कोवळे
स्वप्न ओंझळीत कोमेजले
अस्तित्व तिचे बहुतांश हे
मनात चित्र हे रेखाटले !!धृ!!
सुरेख वर्णिले मनात मी
बहरु दे नववृक्ष मनी
गोड क्षणांची ही अनुभूती
आपल्यात जन्मावी खेळावी
गोड गोजिरी ही राणी परी !!१!!
गोड लाजणे, गोड हसणे
नवे नवे हे बोल शिकणे
कोंब तो उमलला गर्भात
सांभाळू तिला नऊ महिने
आणू तिला सुंदर जगात !!२!!
