कोमल तरीही कणखर..
कोमल तरीही कणखर..
1 min
532
'कोमल तरी ही कणखर' ती म्हणजे स्त्री
थांबते ना क्षणभर , उद्योगरत म्हणजे स्त्री.
विझली जरी चूल, आशा जागवते गँसवर स्त्री
संकटाआधीही जाणते चटके सत्वर तीच स्त्री.
शहारते, मोहरते, बावरते तरीही सावरते स्त्री
जगते, तगते आणि जगवते जगाला बीज स्त्री.
स्मरून जुनी वाट मार्ग नवा शोधते मीनाक्षी स्त्री
घडवते अद्दल क्रुरकर्म्यास बनून सर्वसाक्षी स्त्री.
अंकुर तीच्यातून बनते अंकुश उन्मादावर स्त्री
कमजोर नव्हे सरस कणभर व्यापून उरते... स्त्री
