कन्यादान...
कन्यादान...
हृदयाचा पाझर स्पंदनाची धडधड तू ,
डोळ्यांची आस श्वासांचे कारण तू ...
मुक्या मनाचे बोलणे रित्या स्वप्नाचे हसणे ,
अश्रुचे ही होईल गाणे तो सूर तू ...
पाण्यावरचे तरंग मनातले अभंग ,
स्वप्नातल्या गोडव्याचे हृद्यस्पर्शी सुगंध तू ...
अविरत झरणारी धार पारावरचा गारवा ,
पाड्यावरच्या आंब्याचा सुमधूर छंद तू...
बांबाच्या डोळ्यातली परी जपलेली उरी,
कन्यादानात दान केलेले काळीज तु...
दूराव्यातही सुखावलेली अश्रूतही हसलेली,
सृष्टीला निर्माण करणारी जगतजननी तू ...
