कनक पारस
कनक पारस
1 min
262
कनक - पारस
दोघाचीच जोडी
परिस स्पर्शाने
सुवर्णाची गोडी ।।
परिस लागता
होई त्याचे सोने
चमत्कार त्याचा
असा कोण जाणेे ।।
पारसाच्या अंगी
बहू गुण भारी
परी ओळख ती
असावी अंतरी ।।
भक्तिचेच गातो
सदा गुण गाण
जाणे कनकाला
त्याचेच कल्याण ।।
असता जवळ
आपल्या परिस
नसता ओळख
इतर जनास ।।
