किती रंगला खेळ
किती रंगला खेळ
1 min
242
इथेच आणि ह्या कचेरीत
मैत्रीचा जमला मेळ
सख्यांनो किती रंगला खेळ
रेशमी आपुली मैत्रबंधने
आपुलकीचे रंग गहिरे
त्या सर्वांचा जीवनावरी
ठसा उमटला एक
सख्यांनो किती रंगला खेळ
सहजी आपण जवळी आलो
गुजगोष्टींमधी रमून गेलो
कधी न कळले वर्षे सरली
निवृत्तीची ये वेळ
सख्यांनो किती रंगला खेळ
हसत-खेळत इथेच रमलो
सहज सखी-शेजारिणी झालो
उद्यापासूनी अंतर पडणे
वियोगाची ही वेळ
सख्यांनो किती रंगला खेळ
आठवांचे घट सवे घेऊनी
आता वळते नव वळणावरी
निरोप घेते साश्रू नयनी
नवजीवनाची वेळ
सख्यांनो किती रंगला खेळ!!
