किमया निसर्गाची
किमया निसर्गाची


रखरखत्या उन्हात भिजले अंग घामाने|
मातीच्या ओलाव्याने रान झाले सुगंधाने||
किती उदात्त त्या निसर्गाची किमया न्यारी|
शितल छायेने मज आनंद उभारी||
पाखरांची शाळा जणू भरली झाडावर|
चिवचिवाट रान सारं प्रेम माझं निसर्गावर||
गारगार मनावर उंच डोंगर टेकडीचा अवतार|
वाट दुरवर दिसे पार बहरलेलं माझं शिवार||
मनाचे हे काहुर लेखणी शब्द आतुरले|
निसर्गाच्या सहवासाने प्रेम मज मुक्या प्राण्यांनी शिकवले||