STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

किळस

किळस

1 min
286



।। किळस ।।

वागतात ही माणसं

कशी किळस वाणी

भांबवलेल्या नजरा

आतून कपट मनी ।।


दिसतो साधा सुधा

नजर त्याची पापी

अंगाणे मळकटलेला

पांढरी शुभ्र टोपी ।।


गर्दीत माणसाच्या

मारता हळूच धक्का

मुडदूसलेला चेहरा

भांमटा दिसे पक्का ।।


भक्ती करे वर वर

लावून कंपाळी टिळा

किळस वाणी भावना

स्त्रीशी लावतो लळा ।।


माय बहिण विसरुन

वागतो किळस वाणी

करतो लगट स्त्रीशी

सारी करुन बेईमानी ।।


नराधम वासनांध

हा पिसाळलेला कुत्रा

बांधून चौकात उलटा

ही नशा माजाची उत्रा ?।।


Rate this content
Log in