Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ayush Homeopathy

Classics Inspirational

3  

Ayush Homeopathy

Classics Inspirational

किल्ले पुरंदर

किल्ले पुरंदर

1 min
213


शूर किती हा किल्ले‌ पुरंदर

धैर्याचा वाली हा धुरंधर

अफाट महिमा याच्या ठायी

किर्ती यांची सांगु मी कशी


शिवबाचा छावा येथे जन्मला,

येथे वाढला, येथे खेळला.

अखंड वेदना त्याने सोसल्या

नाही वाकला, नाही मोडला

स्वराज्य रक्षणासाठी,

पुरता मातीत मिळून गेला


स्वराज्य संकट आले जेव्हा

उभा ठाकला, पेटुनी उठला

शिवाज्ञा झाली तेव्हा

मुकाट शत्रुला स्वाधीन झाला

वाट पुन्हा त्या शिवरायांची,

या स्वराज्याच्या धन्याची

पाहु लागला, जगु लागला

अखंड यातना सोसु लागला

स्वकीयांचे हाल पाहु लागला

ओसाड प्रांत, बेहाल जनता

सोसणे हे झाले कठीण


कित्येक दिवस लोटुनि गेले

मन‌ही फार तुटून गेले

पुन्हा स्वराज्यात सामील झाला तेव्हा

आले गहिवरून सारे

आजवर जे त्याने सोसले

आयुष्याचे सार्थक झाले


आजही आहे उभा ठाकला

गर्जत आहे, पेटत आहे

गाथा या स्वराज्य लढ्याची

आजही तो सांगतो आहे


शुर असा हा किल्ले पुरंदर

धैर्याचा वाली हा धुरंधर

अफाट महिमा याच्या ठायी

किर्ती याची सांगु मी कशी


Rate this content
Log in