STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

खुर्ची

खुर्ची

1 min
175

सारे धावती खुर्चीसाठी

सत्ता पद मिळवण्यासाठी

करती धावपळ सत्तेसाठी

खुर्चीच्या राजकारणासाठी


मी पहिली वेगळी खुर्ची

शाळेच्या मुख्याध्यापकांची

असे रुबाब फार त्यांचा

खुर्चीही वाटे भारदस्त


शाळेच्या हितासाठी त्यांनी

केला खुर्चीचा वापर

अधिकार वापरू त्यांनी

लावले कामास साऱ्यांना


केला दबदबा निर्माण त्यांनी 

फुलवीला ज्ञानाचा मळा

शाळेची पसरली ख्याती

नावाजती सारे त्यांसी


होताच निवृत्त मात्र ते

खुर्ची लागली खूप रडू

आले कित्येक, गेले कित्येक

पण असा महानायक होणे नाही 


Rate this content
Log in