STORYMIRROR

Sayali Kulkarni

Classics Children

4  

Sayali Kulkarni

Classics Children

खरी शाळा

खरी शाळा

1 min
1.8K

सांग ना गं आई हा कोरोना कधी निघून जाणार?? 

माझी खरी शाळा पुन्हा अगं कधी सुरू होणार??


ऑनलाईन शाळेत मुळी गंमतच येत नाही.. 

मित्रांना भेटल्याशिवाय मला छानच वाटत नाही.. 

मित्र नाही, खेळ नाही असली कसली गं शाळा?? 

डबा नाही, मस्ती नाही मला येतो खूप कंटाळा..


दप्तर, डबा घेऊन मी कधी शाळेमध्ये जाणार??

आम्ही सर्व मित्र कधी गं एकत्र डबा खाणार???

बाईंच्या छान छान गोष्टी आम्ही कधी गं ऐकणार?? 

खूप सारी दंगामस्ती आम्ही कधी बरं करणार..???


शाळेतलं मैदान माझी वाट तर बघत नसेल?? 

मुलांशिवाय त्याला अगं मुळी करमतच नसेल..

आमचा वर्ग पण अगदीच सुनासुना असेल..

आमची आठवण काढून बिचारा रडत बसला असेल.. 


देवा तू आता कोरोनाला कायमचा हाकलून दे.. 

लवकरच आमची शाळा पुन्हा सुरू होऊ दे..

हे एकच मागणे मागतो मिळून आम्ही सर्व जण.. 

देवा तू आम्हा सर्वांना आता तथास्तु तेवढं म्हण..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics