खरच आनंदी आहात का
खरच आनंदी आहात का
1 min
186
वाटत तितक सोपं नाही
प्रत्येकाच्या मर्जीत रहायच
आपलं मत बाजूला ठेवून
बाकिच्यांना हो म्हणायच
विचार कधी केला का
आपल्या मताच झालय काय
दाबून ठेवलेला त्याचा श्वास
गुदमरला गेलाय काय
साचलेल्या या भावनांचा
कधी निचरा होणार का ?
गजबजलेल्या या जगात
चेहरा तुझा पूढे येणार का?
अजून ही वेळ आहे
तुम्ही स्वतःला ओळखलत का
बघ शिरून अंतर्मनात
खरच आनंदी आहात का
