खोपा
खोपा
1 min
369
पाखरं विणतात खोपा
काडी काडी जमवून...
पैसा नसतो चालत
कष्टच आणतात कमवून...
आलिशान नसला तरीही
प्रेमाचे असते लिंपण..
पिल्लांसाठी खोपाच असतो
मायेचे अद्भुत शिंपण..
माणसं ही बनवतात
महागडी अशी घरे.
त्यांच्या भिंतीवर असतात
वादांचे कितीतरी तडे...
खोपा असतो अनमोल
किंमत न होणारा...
बाहेरच्या स्वार्थी जगा पासून
पिल्लांना सुरक्षा देणारा..
माणसांनी ही शिकावी कला
मायेचा खोपा बनवण्याची...
आर्थिक देखावा वजा करून
प्रेमाने त्याला सजवण्याची..
