खोपा ( कविता )
खोपा ( कविता )
1 min
492
झाडाला बांधते
खोपा सुगरण
करण्या पिलाचे
सहज रक्षण
काडी गवताची
चोचीने गुंफली
जणू जरीची ती
गोफच विणली
खोपा तो सुरेख
बंगला भासतो
प्रत्येकाचा जीव
त्यातच गुंततो
झुले सुगरण
वाऱ्यावर अशी !
लेकरापायी ती
उरी भीती कशी ?
खोपा लवकर
पूर्ण मग व्हावा
लेकराच्या येण्या
संसार फुलावा
