Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudeo Gumatkar

Others

4  

Vasudeo Gumatkar

Others

खेळ

खेळ

1 min
6.2K


लहान मुलांचा खेळ

आज हरवला आहे

आठवणीतल्या चित्रात

तो जाऊन बसला आहे


गावातल्या प्रत्येक गल्लीत

डाव सारा जमायचा

सुट्टीच्या दिवशी तर

खेळ किती तो रंगायचा


हल्ली काही लहान मुले

मोबाईलात गुंतली आहे

तर काही दप्तराच्या

ओझ्याने वाकली आहे


आज युग सारे बदलले

तंत्रज्ञानही बदलले आहे

नव्या तंत्रज्ञानात मात्र

बालपण हरवत चालले आहे


गल्लीतला खेळ आज

संपत चालला आहे

माणुस माणसापासून

दूर होत चालला आहे


नका हो गमवू बालपण

सर्व त्या लहानग्यांचे

घेऊ द्या आनंद खूप काही

लाभ आहेत खूप खेळण्याचे


Rate this content
Log in