STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

4.5  

SANJAY SALVI

Others

खेळ तुझा न्यारा

खेळ तुझा न्यारा

1 min
24.3K


वर विशाल आभाळ,

खाली अथांग पाताळ,

मध्ये सुंदरही धरा,

तुझा चमत्कार सारा,


प्रभो खेळ तुझा न्यारा,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

आकाश्याच्या मंडपाला,

नाही आधार खांबांचा,


चोहीकडे जाणवतो,

फक्त भास टेकण्याचा,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

प्रभो खेळ तुझा न्यारा,


तुझ्या एका फुंकरीने,

विझे रवी आणि शशी,

तरी आकाशी तरंगे,

तारका ती इवलीशी,


प्रभो खेळ तुझा न्यारा,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

असे सारे घडताना,

एक जीव हि घडला,


अन साऱ्या जगतात,

दिली बुद्धी माणसाला,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

छोट्याश्या या माणसाला,


दिले छोटेसे तू मन,

त्याचा थांगही लागेना,

जरी जात असे प्राण,

प्रभो खेळ तुझा न्यारा,

प्रभो खेळ तुझा न्यारा ...


Rate this content
Log in