खेळ शब्दांचा
खेळ शब्दांचा
1 min
141
असे खेळ शब्दांचा सारा
नको त्यांचा उगाच पसारा
शब्द वापरावे जपून
शब्द ठेवावे साठवून
कधी हसवती कधी रडवती
प्रेमाचा वर्षाव शब्द करती
शब्दांनी नाती जुळती
शब्दांनीच दुरावती
गोड,कटू,कठोर असे शब्द असती
शब्द घाव देती,शब्द साथ देती
शब्दांचा हा खेळ निराळा
शब्दांचा नाद खुळा
शब्द सजवती मनीच्या भावना
शब्द जागवी मनी करुणा
शब्द असावे आपुलकीचे
नसावे ओठी शब्द द्वेष भावनेचे
