Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

4.0  

Savita Kale

Others

खाकी वर्दी

खाकी वर्दी

1 min
1.0K


गर्व वाटतो मला

खाकी वर्दी घालताना

पण बायकोला पाहतो

मनातून रडताना।। १।।


अश्रूंना बांध घालून

नयन प्रश्न करतात

सुखरूप परता तुम्ही

वाट पाहते घरात।। २।।


मूलं, बाळं माझीही

केविलवाणी वाट पाहती

दिवसातल्या प्रत्येक क्षणी

मनामध्ये त्यांच्या भिती।। ३।।


तुमच्यासाठी उभा मी

ढाल होऊनी रात्रंदिनी

माझही आहे गोजिरं कुटुंब

इतकचं असू द्या तुमच्या मनी।। ४।।


तुमच्या साथीनं मला

कर्तव्य बजावायचयं

घरट्याकडे माझ्या

पिल्लांसाठी परतायचयं।। ५।।



Rate this content
Log in