STORYMIRROR

Sheetal Ishi

Others Children

3  

Sheetal Ishi

Others Children

कधी वाटते....

कधी वाटते....

1 min
132

कधी वाटते सूर्य व्हावे 

सृष्टी सारी प्रकाशित करावी 

कधी वाटते धरा व्हावे 

चराचरसृष्टीस निर्मावे

कधी वाटते पक्षी व्हावे 

नभात उगीच विहरावे 

कधी वाटते झरा व्हावे 

खळखळ वहात राहावे 

कधी वाटते समुद्र व्हावे 

अथांगता त्याची अनुभवावी 

कधी वाटते फुल व्हावे 

इतरांचे जीवन सुगंधित करावे 

कधी वाटते वृक्ष व्हावे 

चराचरास सावली द्यावी 


Rate this content
Log in