कधी एकदा
कधी एकदा
1 min
446
कधी एकदा करावी म्हणते
वाट वाकडी तुझ्याकडे
भरभरून बोलताना मी
पाहते तुझ्या डोळ्यांकडे
कधी एकदा टाकावी म्हणते
पांघरलेली कात इकडे
नव्या जोमाने घेऊन गिरकी
धावते मी चोहीकडे
कधी एकदा चढवावे म्हणते
आधुनिक विषयांचे जोडे
नव विचारांचे घडवावे
नखशिखांत सुंदर तोडे
