STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

कैफियत...!

कैफियत...!

1 min
27.4K




काहीतरी लिहिताना

मनात काहूर उठत

वाटत लिहावं की लिहू नये


अक्षर ,शब्द पिंगा घालतात

डोक्यात घुमतात

वाटत लिहावं की लिहू नये


कल्पना अचाट येतात

मनाचा ताबा घेतात

वाटत लिहावं की लिहू नये


प्रसंग अतिप्रसंग

जसेच्या तसे समोर उभे राहतात

वाटत लिहावं की लिहू नये


अक्षरं ,शब्द आपली माया

प्रेमाने मनसोक्त देऊ करतात

वाटत लिहावं की लिहू नये


मग अशी वेळ येते

लिहिता लिहिता लेखणी अडते

आणि म्हणते

माझ्या लेखणीचे मोल

इन्शुरन्स सारखे असेल


तर काय उपयोग...?

मोल मिळेल

ना मिळेल देव जाणे

आणि पुन्हा वाटत

लिहावं की लिहू नये

प्रश्न अनुत्तरित राहतो

आणि लेखणी थांबते

खूप वाईट वाटत....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन