काय सांगू..!
काय सांगू..!
1 min
6.8K
देव म्हणाला
मला काहीतरी सांग
मी म्हंटल
आता काय सांगू...?
तझेच खेळ सारे
तुलाच ठावे सारे
मला काय विचारतो
रे आता देवा...!
जळी काष्टी पाषाणी
तूच असतोस ना रे
मग कारे अपराधी
दिसतात समाजात रे..?
तुझ्या ठायी भक्ती
तुझ्या ठायी शक्ती
तुझीच युक्ती
खरे ना रे..?
मग नको विचारू
मला आता काही
तुला रे देवा
आता मी काही सांगणार नाही..!
तूच करता तूच धरता
तूच रे विधाता
अवनीवरी आता
तू एक रे सुखकर्ता...!