STORYMIRROR

Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

काय आहेस तू !

काय आहेस तू !

1 min
270

न उलगडलेल कोड आहेस तु

माझ्या जीवनात आलेली गोड क्षण आहेस तु

तु काय आहेस एक रहस्य आहेस तु

पण, प्रत्येकाच्या चेह-यावरील हास्य सुद्धा आहेस तु

आयुष्यात मिळालेला अनमोल तोफा आहेस तु

सगळ काही सुगंधित करुन टाकणारी फुल आहेस तु

समुद्रकाठी क्वचित सापडणारा मोती आहेस तु

तर निसर्गातील निस्तब्ध शांतता आहेस तु

एक छानसी मिळालेली छाया आहेस तु

न संपणारा मायेचा साठा आहेस तु

माझ्या जीवनात घेतलेल एक वेगळ वळण आहेस तु

काही क्षणातच घडुन टाकलेला बदल आहेस तु 

मायेच्या ओलाव्याचा पाऊस आहेस तु

माझ्या नविन कल्पनांना भरारी देणार स्वप्न आहेस तु

शब्दांनी फेडण्यासारखं हे नाही देण

जन्मोजन्मी राहील मला तुझ हे घेण

वाटता येणार नाही अशी आहे ही गोष्ट

करते प्रार्थना नेहमी न लागो ह्याला कधी दृष्ट

तु असतेस चमकत्या ता-यासारखी

जीवनात प्रत्येकाच्या भरपुर प्रेम देणारी

म्हणुन वाटत,

फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो

माणुस तरी एकटा कसा राहणार?

म्हणुन तो तुला पाठवतो

एवढं बघुन वाटतं,

तेजस्वी सचेत दिसणा-या रुपेरी चांदण्यात चमकणा-या

सुगंधी फुलात फुलणा-या मनात राहणा-या, ह्रदयापासुन

जवळ असणा-या माझ्या त्या फक्त,आईसाठी.... 


Rate this content
Log in