कातरवेळ
कातरवेळ
1 min
854
आज अशा या कातरवेळी
आठवण तुझी आली मला
रम्य असा तो भुतकाळ
वर्तमानासम उलगडला
आम्रतरूच्या छायेखाली
देवाणघेवाण वचनांची
आम्रवृक्ष तो आजही देतो
साक्ष आपुल्या प्रेमाची
रुसवा, फुगवा तुझा अबोला
वेड लावितसे माझ्या जीवा
भेटाया तुज रोज सखे
शोधे मी बहाणा नवा
वसले होते गाव प्रेमाचे
स्वप्नांच्या पलीकडले
आज आठवणी राहतात तेथे
'प्रेम' कुठे ते हरवले
नित अंगणी येतो 'रावा'
मज आशा तुझ्या निरोपाची
सरता सरेना ही 'कातरवेळ'
वाट पाहतो तुझ्या परतण्याची
