कातरवेळ ( अष्टाक्षरी )
कातरवेळ ( अष्टाक्षरी )
1 min
274
अशी ही कातरवेळ
सतावते आठवण
तुझ्या वाचून सरतो
एक वर्ष वाटे क्षण
रस्त्यावर ती नजर
भास प्रत्येक वेेळेला
हवेतील तो गारवा
येतो शहारा अंगाला
सजवले घरदार
दारी रांगोळी सुरेख
ल्याले ते साज शृंगार
कर तुच रे पारख
ओढ अशी दिवसाची
संपवावी ती क्षणात
सांज खुलावी मग ती
आपल्याच अंगणात
