कांचनसंध्या
कांचनसंध्या
1 min
444
दारी ये कांचनसंध्या
जाऊ स्वागतास जोडी
हास्य मुखावर यावे
मधु शर्करेची गोडी (१)
लाभे एकांत जीवनी
आता उरलो दोघेच
सारीपाट आयुष्याचा
डाव खेळूया इथेच (२)
नातीगोती विरलीशी
नको जुन्या आठवणी
नव्या सोनपटावरी
गाऊ मधुरशी गाणी (३)
पैलतीर लांबवर
आता दृगोचर असे
प्रीती तराण्यांची मजा
वेगळीच भासतसे (४)
सोनसळी पैलतीर
रम्य एकांती भासतो
देऊ घेऊ वचनांसी
नाते अक्षय जोडतो (५)
आनंदाचे धाम सखे
आनंदाने नाचू गाऊ
एकांतात हात हाती
प्रेमसागरात नाहू
