काम
काम
1 min
308
काम करतांना
वाटावी ना लाज
श्रमाची महती
जाणून घे आज
कामाची विभागणी
नसते स्त्री - पुरुषावरुन
प्रत्येक क्षेत्रात घडते
क्रांती श्रमाच्या पुजेवरून
लहानपनापासून संस्कार
दयावेत श्रम प्रतिष्ठेचे
श्रम करणाऱ्या प्रत्येक
व्यक्तींच्या आदराचे
काम नसते हलके श्रेष्ठ
प्रत्येकाचे मोल जाणावे
प्रत्येकाने आपल्या अंगी
श्रम मूल्य ते रुजवावे
