काळजाआडच्या सुया...
काळजाआडच्या सुया...
स्वतःत लपलेल्या एकट्या ‘स्व’ ला
कधी म्हणून पाहा, कसा आहेस जिवा
खोलवर साचलेल्या गढूळ वेदनांना
निरखून विचारा, काय चाललेत हाल
उठताच वेदनांचे कल्लोळ, हिरावून घ्या
धारदार टोकांचे, शाब्दिक काटेरी बाण
काळजीच्या सुराने खेचून काढा बाहेर
आपलं सतत खच्चीकरण करणाऱ्या
काळजाआड दडलेल्या लुप्त सुया...
