काळी माया साद घाली
काळी माया साद घाली

1 min

11.6K
गेला पाऊस पडून
धरणीला आली घात
पेरा एक एक दाणा
धरित्रीच्या उदरात
पावसाचा ओला थेंब
झिरपला आत आत
आता तरारेल कोंभ
धरतीच्या उदरात
जोडा रे औत पाभारी
पेरणीची वेळ आली
नका फिरूच माघारी
काळी माय साद घाली
ओल्या गर्भार कुशीत
दाणा दाणा तो रूजल
शालू लेऊन हिरवा
माय धरणी सजल
थंडी वारा पावसात
राबतो ग बळीराजा
यज्ञ तो अन्न ब्रह्माचा
करी जगाचिया काजा