STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

काही बोलायचे आहे

काही बोलायचे आहे

1 min
28.4K


काही बोलायचे आहे.


प्रेम भरल्या स्मृतींनी

सखे डोलायचे आहे

नको जाऊ थांब जरा

काही बोलायचे आहे...१


प्रेम तुझ्या माझ्यातले

होते इथेच फुलले

काळ किती घालवला

भान नव्हते उरले....... २


होता निसर्ग साक्षीला

जाई, जुई, फुले किती

त्यांच्या समीप बसता

दोघांमध्ये खुले प्रीती...३


वारा सुटला वादळी

ढग नभात दाटले

लागे पाऊस कोसळू

अंग अंगाशी खेटले....४


किती काळ मिथिमध्ये

नाही कुणा समजले

पुढे बाप तुझा उभा

सारे कसे उमजले.....५


झाली ताटातूट तेव्हा

आज अचानक भेट

ताज्या झाल्या आठवणी

घुसे काळजात थेट....६


सारे गुपित मनाचे

आज खोलायचे आहे

मन मोकळे पणाने

काही बोलायचे आहे...७


साहित्याला गुण द्या
लॉग इन